Translate

Thursday, 21 May 2020

एक जूनपासून धावणाऱ्या रेल्वेच्या तिकीट बुकींगला सुरूवात, पण प्रवास नियमानुसार करावा लागणार.


एक जूनपासून धावणाऱ्या रेल्वेच्या तिकीट बुकींगला सुरूवात, पण प्रवास नियमानुसार करावा लागणार.


एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार आहेत. या ट्रेन कोणत्या आहेत आणि वेळापत्रक रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलं आहे. या स्पेशल २०० ट्रेनचं बुकिंग आज गुरूवारपासून सकाळी दहा वाजल्यानंतर सुरू होणार आहे. यामधील ५० ट्रेन मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या असणार आहेत.

सुरूवातील फक्त नॉन एसी रेल्वे गाड्या धावणार असं रेल्वेनं स्पष्ट केले होतं मात्र आता एसी आणि जनरल बोगीही असणार आहेत. तिकिटाची बुकिंग फक्त IRCTC च्या वेबसाइट आणि अॅपवरून होणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या ट्रेनमध्ये आरएसी आणि वेटिंग तिकिटे दिली जातील मात्र वेटिंग तिकटवाल्यांना ट्रेनमध्ये जाणाच्या परवानगी नाही.

या स्पशेल २०० ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वे निघण्यापूर्वी ९० मिनिटं आधी येणं बंधनकारक आहे. त्याशिवाय सर्व प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं जामार आहे. ज्यामध्ये त्या प्रवाशाला करोनाची लक्षणं आहेत का ? याची तपासणी होणार आहे. ज्या प्रवाशाला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत अशाच प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. चादर, ब्लॅंकेट आणि पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांनी घरातून निघताना आपलं सामान घेऊन निघावे. तसेच सर्व प्रवाशांना आरोग्य सेतू अॅप डाउनडोल करणं बंधनकारक आहे. त्यासोबत फेसमास्कही बंधनकारक करण्यात आलं आहे.

या गाड्या या श्रमिक ट्रेन्स व्यतिरिक्त आहेत. श्रमिक ट्रेन मोठ्या प्रमाणावर धावणार आहेत. यासाठी अनेक नवे नियम करण्यात आले आहेत.रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. ही दुकाने उघडण्यासाठी कार्यवाही सुरू करा असे आदेश रेल्वे विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पण हे करताना काही काळजी घेण्यासही सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशात सर्वाधिक हाल सहन करावे लागत आहेत ते स्थलांतरित मजुरांना. या मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्स याआधीही सोडण्यात आल्या. एक जूनपासून रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी तीन दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्यामुळे रेल्वेने स्टेशनवरची दुकानेही सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने सर्व व्यवहार ठप्प होता. लोकांच्या हाताला काम नव्हतं. आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment