Translate

Friday, 8 May 2020

मुंबई, पुण्यातून गावी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी



मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता सर्वच ठिकाणी लॉकडाऊनचे नियम अधिक सक्तीचे करण्यात आले आहेत. त्यातच लॉकडाऊनच्या या काळात आता विविध ठिकाणी अडकलेल्यांना आपल्या मुळ गालवी, घरी परतण्याचे वेळ लागले आहेत. जवळपास दीड महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतरस आता मुंबई, पुण्यासारख्या विविध शहरांमध्ये असणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 



शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णय़ामुळे आता राज्यातच विविध ठिकाणी अडकलेल्या मंडळींनाही स्वगृही पोहोचता येणार आहे. या मंडळींना त्यांच्या गावी पोहोचवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. याकरता लाल परी, अर्थात एसटीची मदत घेतली जाणार आहे. 




No comments:

Post a Comment