आपणा सर्वांस कळकळीची नम्र विनंती,
राज्यात पुन्हा कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ होत आहे. आपण सर्वांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आपल्या अवतीभवती असलेल्या कित्येक चांगल्या व जीवास जीव देणा-या व्यक्तींना ह्या दुष्ट कोरोनाने क्षणाचाही विलंब न लावता हिरावुन नेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुर्वीपेक्षा अधिक काळजी घेऊनच सार्वजनिक जीवनात वागले पाहिजे. त्यासाठी *माझे कुटुंब, माझी जबाबदारी* ह्या शासनाच्या निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. *"जान है तो जहान है"* म्हणुन कृपया आपण योग्य ती काळजी घेऊनच आपला सार्वजनिक वावर करावा. घरातुन बाहेर पडताना *मास्क लावा, बाहेरुन आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुवा.* मला काहीच होणार नाही, मी तंदुरुस्त आहे, माझी रोग प्रतिकारशक्ती खुपचं स्ट्राँग आहे, या भ्रमात कृपया राहु नका. Please स्वतःसाठी नाही, निदान आपल्या कुटुंबासाठी, आपल्या चिमण्या पाखरांसाठी तरी आपली काळजी घ्याच.
No comments:
Post a Comment