Translate

Thursday, 7 May 2020

शेतकर्यांना कर्जमाफी दिल्यावर अनेकांनी टीका केली. पण आज सर्व इंडस्ट्रि बंद झाली आहे, पण एकच इंडस्ट्रि सुरू आहे agro इंडस्ट्रि आणि ती सर्व देशाला पोसत आहे. आज देशाला गाडी, मोबाईल, टीव्ही काहीही घ्यायचं नाही.



शेतकर्यांना कर्जमाफी दिल्यावर अनेकांनी टीका केली. पण आज सर्व इंडस्ट्रि बंद झाली आहे, पण एकच इंडस्ट्रि सुरू आहे agro इंडस्ट्रि आणि ती सर्व देशाला पोसत आहे. आज देशाला गाडी, मोबाईल, टीव्ही काहीही घ्यायचं नाही. फक्त घ्यायचं आहे भाजीपाला, दुध, जीवनावश्यक वस्तू आणि ती फक्त शेतकरीचं पुरवू शकतो. आपण सगळे घरी बसलो आहोत पण शेतकरी आज बांधावर आहे हे सर्व पिकवत आहे. आणि देशाला पुरवत आहे. म्हणून सर्वात अगोदर शेतकर्यांचा विचार होणे आवश्यक आहे. कारण सर्व बंद झालं तरी काहीही फरक पडत नाही. पण शेती बंद झाली ना तर जीवनचं बंद होईल. 





आता सगळ्या जगाला समजणार घरी किंवा बँकेत कितीही पैसे असले तरी खायला भाजी, भाकरी, चपाती, भात लागतो पैसा नाही. हाच तो शेतकरी त्याला आपण गावठी, अडाणी समजत होतो आता तोच घरी निवांत झोप घेतोय. बाकी सगळ्यांच्या मात्र झोप उडाल्या आहेत. 
नोकरी करणारा फक्त आपले कुटुंब पोसतो, पण एक शेतकरी संपूर्ण जीव पोसतो. खरंच शेती शिवाय मज्जा नाही, वावर आहे तरचं पावर आहे. 


🎑🌱🌾मी एक शेतकरी, आमची शेती 🌾🌱🎑

No comments:

Post a Comment